कानपूरमधील गावात अवैध घर पाडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक
दोघा तरुणांना अटक
कानपूर (उत्तरप्रदेश) – कानपूर जिल्ह्यातील पुखराया गावामध्ये न्यायालयाच्या आदेशावरून अवैध घर पाडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काही तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी २ तरुणांना अटक केली आहे. या वेळी पोलिसांनी दगडफेक करणार्या तरुणांवर लाठीमार केला. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. तरुणांच्या दगडफेकीमध्ये २ पोलीस आणि अन्य एक तरुण गंभीररित्या घायाळ झाले होते.
कानपुर में अवैध मकान गिरवाने पहुँची पुलिस पर ईंट-पत्थरों से हमला, 3 घायल: UP पुलिस ने छत पर चढ़ बरसाई लाठियाँ, 2 पत्थरबाज गिरफ्तार#Kanpurhttps://t.co/UvOalNH9sC
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 20, 2022
संपादकीय भूमिकापोलिसांवर दगडफेक करण्याचे धाडस होत आहे, याचा अर्थ ‘त्यांचा धाक राहिलेला नाही’, असेच म्हणावे लागेल ! |