देहलीमध्ये चीनच्या महिला गुप्तहेराला अटक
बौद्ध भिक्खूच्या वेशात रहात होती !
नवी देहली – देहली पोलिसांनी येथील मजनू का टीला भागातून चीनच्या एका महिला हेराला अटक केली आहे. ही महिला येथे बौद्ध भिक्खूच्या वेशात रहात होती. तिचे नाव काय रुओ आहे. ही महिला नेपाळी नागरिक असल्याचे सांगून देहलीमध्ये रहात होती. पोलीस आता तिच्या सहकार्यांचा शोध घेत आहे.
Delhi Police arrest Chinese woman for involvement in anti-India activities disguising herself as a Nepali Buddhist monkhttps://t.co/PIWEAoIG1a
— OpIndia.com (@OpIndia_com) October 21, 2022
ही महिला नेपाळमार्गे भारतात पोचल्याचा संशय आहे. तिने तिच्या ओळखपत्रावर डोल्मा लामा असे नाव लिहिले होते. तसेच पत्ता काठमांडूचा दिला होता; पण फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाच्या चौकशीत ही महिला चीनच्या हेनान प्रांताची नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. ही महिला वर्ष २०१९ मध्ये चिनी पारपत्रावर भारतात आली होती. तिला इंग्रजी, चिनी आणि नेपाळी भाषा येते.
संपादकीय भूमिकाइंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात रशियाच्या गुप्तचर संस्था केजीबीच्या हस्तकांचा देशात सुळसुळाट झाला होता, असे म्हटले जाते. आता पाकिस्तानच्या हस्तकांचा सुळसुळाट असतांना चीनचेही गुप्तचर भारतात कारवाया करत आहेत, हे पहाता ‘भारत या देशांसाठी धर्मशाळाच झाली आहे का ?’, असा प्रश्न पडतो ! |