संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात पालकमंत्र्यांकडून विद्युत् जनित्राच्या प्रस्तावाला मान्यता !
भ्रमणभाषच्या उजेडात आधुनिक वैद्यांकडून उपचार !
संभाजीनगर – येथील जिल्हा रुग्णालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या दातांवर उपचार चालू असतांनाच वीज गेल्याने अंधार पडला होता. त्यांनी विद्युत् जनित्राविषयी विचारणा केली; मात्र ‘गेल्या ५ वर्षांपासून विद्युत् जनित्राची मागणी प्रलंबित आहे’, अशी माहिती उपस्थित आधुनिक वैद्यांनी त्यांना दिली. त्यानंतर भुमरे यांनी विद्युत् जनित्रांसह इतर मागण्यांच्या प्रस्तावाला तातडीने संमतीचे निर्देश दिले, तसेच नवीन विद्युत् जनित्र येईपर्यंत ‘कोविड केअर सेंटर’मधील विद्युत् जनित्र आणावे, असेही त्यांनी निर्देश दिले. भुमरे यांच्या दातांवर भ्रमणभाषच्या उजेडात उपचार करण्यात आले; मात्र कक्षात अंधार पडल्याने भुमरे यांनी संताप व्यक्त केला होता.
संपादकीय भूमिकालोकप्रतिनिधींनी रुग्णालयांतील सर्व समस्या सोडवून नवीन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा ! |