लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे शिक्षिकेवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी इम्रान याला अटक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील एका शिक्षिकेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी इम्रान उपाख्य मुस्तफा याला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. या चकमकीत इम्रान याच्या पायाला गोळी लागली आहे. दुसरा आरोपी आकाश तिवारी याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरला या दोघा आरोपींनी १८ वर्षांच्या शिक्षिकेला रिक्शात बसण्यास सांगून तिचे अपहरण करून एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तिला बेशुद्ध करून एका चौकात नेऊन फेकून देऊन ते पसार झाले होते.
Lucknow Gangrape Case: Second accused Imran arrested after police encounter #LucknowGangrape #UttarPradesh https://t.co/gnhQHscJu8
— Organiser Weekly (@eOrganiser) October 19, 2022
संपादकीय भूमिकाअशा बलात्कार्यांना इस्लामी देशांत ज्या प्रमाणे शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याचे किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देतात, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |