मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर सासरी झालेल्या छळामुळे हिंदु तरुणीची आत्महत्या !
पूर्णिया (बिहार) – येथील सोनू आलम या मुसलमान तरुणाचे हिंदु तरुणीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवून तिच्याशी विवाह केल्यानंतर तिचे धर्मांतर केले. नंतर तिचा सासरी छळ करण्यात आल्याने या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. आरती नाग असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या छळावरून पंचायतीमध्येही चर्चा झाली होती; मात्र नंतरही तिचा छळ चालूच होता. पोलीस या आत्महत्येची चौकशी करत आहे.
सोनू आलम हा पूर्णियातील महंमदपूर गावात रहाणारा आहे. तो बेंगळुरूमध्ये मजुरीचे काम करत होता. फेसबुकद्वारे त्याची आरतीशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे प्रेमात रूपंतार झाल्यानंतर आरतीने आलम याच्याशी विवाह करून धर्मांतर केले आणि ती त्याच्या महंमदपूर येथील घरी राहू लागली. येथे तिला प्रतिदिन मारहाण होऊ लागली होती. याविषयी पंचायतीकडून तिला न्याय मिळाला नव्हता.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते ! |