ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण व्यवस्थापन विभागाचे लाचखोर उपकार्यकारी अभियंता कह्यात !
ठाणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारावी धरणाच्या व्यवस्थापन विभागाचे अंबरनाथ येथे कार्यालय आहे. येथील विश्रामगृहाची स्वच्छता आणि देखभाल यांचे कंत्राट घेतलेल्या एका कंत्राटदारांची भरलेली अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी बारवी धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय माने यांनी ७८ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५० सहस्र रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेतल्याचे अन्वेषणातून उघड झाले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माने यांना कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)
संपादकीय भूमिकाप्रशासकीय क्षेत्रातही लाचखोरांचा सुळसुळाट ! |