जालना येथे आयशर-रिक्शाच्या भीषण अपघातात ५ ठार, २ घायाळ !
जालना – भरधाव आयशर आणि ॲपे रिक्शा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात रिक्शातील ५ जण जागीच ठार झाले आहेत, तर २ जण गंभीर घायाळ झाले आहेत. जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा गावाजवळ १७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परवीन शहा, आलिया शहा मुस्कान शह, कैफ शहा आणि मनीषा तिरुख अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असून पोलीस आणि ग्रामस्थ यांनी घायाळ झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.