श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने
साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते ! : एखादी कृती किंवा घटना यांना काळानुसार आपण ‘देवाची लीला’ म्हणू शकतो. साधना करतांना आपली प्रत्येक गोष्टीकडे पहाण्याची दृष्टी पालटते. जीवनात दुःख आले, तरी साधकाला ती भगवंताची एक लीलाच वाटते; परंतु सामान्य माणसाला मात्र तीच गोष्ट दुःख देऊन जाते.