धर्मशिक्षणाच्या अभावी मजारीला ‘कुलदेवता’ मानून तिची पूजा करणारे नतद्रष्ट हिंदू !
नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक कृतीचा एक भाग म्हणून आठव्या दिवशी यज्ञ केला जातो. एका नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी यज्ञ करणार्या पुरोहिताने यज्ञाच्या ठिकाणी देवतांची चित्रे लावली होती. त्या लावलेल्या चित्रांमध्ये हिंदूंच्या देवतांच्या मध्ये एका मजारीचे (मुसलमानांच्या थडग्याचे) चित्र लावले होते. हे चित्र त्या यज्ञाचे यजमान असलेल्या कुटुंबियांनी आणले असल्याचे त्या पुरोहितांनी सांगितले. त्या कुटुंबातील सदस्यांनी ‘मजारीची पूजा करणे, हा आमच्या कुलाचाराचा भाग आहे’, असे सांगितले. येथे समाजातील काही कुटुंबे मजारीला त्यांची कुलदेवता मानून तिची श्रद्धेने पूजा करतात.
– सुजाता ठाकेर, कोईंबतूर, तमिळनाडू.