दौंड (जिल्हा पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई आणि अधीक्षक यांना लाच घेतांना अटक !
पुणे – दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. डांगे यांनी शिपायाद्वारे ही लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दौंड पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेले उपजिल्हा रुग्णालय ! |