५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सत्तरी (गोवा) येथील कु. मनुश्री उत्तम दवणे (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मनुश्री दवणे ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
‘सत्तरी (गोवा) येथील कु. मनुश्री उत्तम दवणे हिच्या आईला लक्षात आलेली तीची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. जन्मापूर्वी
१ अ. रामनाथी आश्रमात गेल्यावर प्रथमच गर्भाची हालचाल जाणवणे : ‘मी गरोदर असतांना यजमानांसह रामनाथी आश्रमात गेले होते. आम्ही स्वागतकक्षात प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राजवळ बसलो होतो. तेव्हा ‘गर्भाने प्रथमच हालचाल केली’, असे मला जाणवले.
१ आ. स्वप्नात श्री महालक्ष्मीदेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे
१ आ १. लक्ष्मीदेवीचे दर्शन होणे : ‘मुलगी झाली, तर तिचे नाव ‘मनुश्री’ ठेवायचे’, असे आम्ही ठरवले होते. ‘मनुश्री’ नावाचा अर्थ शोधल्यावर ‘ते नाव लक्ष्मीदेवीचे आहे’, असे आम्हाला समजले. ८ मासांची गर्भवती असतांना मला स्वप्नात लक्ष्मीदेवीचे दर्शन झाले.
१ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन त्यांनी आशीर्वाद देणे : मनुश्रीच्या जन्माआधी एक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, ‘जन्माला येणारे बाळ तुम्हाला साधनेत पुढे घेऊन जाईल.’ त्या वेळी मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉक्टरांना) पाहिलेले नसतांनाही ही अनुभूती आली.
१ इ. देवळात गर्भाने अधिक हालचाल करणे : यजमानांनी मला सांगितले, ‘‘बाळ सात्त्विक होण्यासाठी तुला अधिकाधिक नामजप करावा लागेल.’’ त्यानुसार मी गर्भारपणाच्या तिसर्या मासांत आठवड्यातून २ – ३ वेळा राधा-कृष्ण मंदिरात जाऊन १ – २ घंटे नामजप करायचे. तेव्हा गर्भाची हालचाल अन्य ठिकाणांपेक्षा अधिक होत असल्याचे मला जाणवायचे.
२. जन्मानंतर
२ अ. मनुश्रीला सामाजिक कार्यक्रमात नेल्यावर ती रडणे; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा’ पहातांना ४ घंटे शांत रहाणे : आम्ही माझ्या नातेवाइकांच्या लग्नाला गेल्यावर मनुश्री (वय १ वर्ष) एवढी रडत होती की, तिला अर्ध्या घंट्याच्या आत घरी पोचवावे लागले. अन्य एका लग्न समारंभातही तिची तशीच स्थिती होती. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा’ साधकांना ‘ऑनलाईन’ दाखवणार होते. सोहळ्याला येण्यापूर्वी माझ्या मनात भीती होती की, ‘आम्हाला हा सोहळा पहाता येईल कि नाही ?’; परंतु तिने ४ घंटे शांतपणे सोहळा पाहिला. ती त्या वातावरणाचा आनंद घेत असल्याचे मला जाणवले. सर्व साधकही तिचे कौतुक करत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशीही ती शांत होती.
२ आ. धर्माचरण आणि स्वयंशिस्त
१. ती जेवण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी नमस्कार करण्याची आठवण करते.
२ इ. साधना
१. ती सतत स्थिर असते.
२. ती नामजप करत आहे. कधी कधी ‘ती अनेक वर्षांपासून साधना करत आहे’, असे मला जाणवते.
२ उ. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : ती श्रीकृष्णाच्या चित्रासह खेळते. ती श्रीकृष्णाच्या चित्राची पुनःपुन्हा पापी घेते. ती कधीकधी ‘आबांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) जाऊया’, असे आवर्जून सांगते.
३. स्वभावदोष : हट्टीपणा
‘प.पू. गुरुदेव, माझ्या अल्प बुद्धीला जे समजले, ते लिहिण्याचा प्रयत्न केला. ‘बाळाचा जीवनभराचा प्रवास ईश्वरप्राप्तीच्या दिशेने असू दे. तिच्यावर योग्य ते साधनेचे संस्कार करता येऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’
– सौ. स्वराली दवणे (मनुश्रीची आई), सत्तरी, गोवा. (३१.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |