रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
१. श्री. प्रवीण दुबे (प्रमुख मार्गदर्शक, बजरंग सेना, भाग्यनगर), भाग्यनगर, तेलंगाणा.
अ. ‘रामनाथी आश्रमातील वातावरण उत्तम असून येथील साधक सकारात्मक आहेत.
आ. हा आश्रम एखाद्या मंदिराप्रमाणे असून येथे मला खर्या अर्थाने भक्तीभाव अनुभवता आला.
इ. या आश्रमात यायला मिळाल्यामुळे मला धन्य वाटले.’ (१७.६.२०२२)
२. श्री. निखिल वीज, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल
अ. ‘रामनाथी आश्रमातील सात्त्विकतेत लक्षणीय वाढ झाली आहे. मला आश्रमात सर्वत्र चैतन्य जाणवले.
आ. आश्रमातील पारदर्शक झालेल्या लाद्यांकडे पाहून माझ्या मनाला शांत वाटले. माझ्या मनातील विचार पुष्कळ घटले आणि मला आतून शांत वाटत होते.’ (१७.६.२०२२)