गोवा येथील शेतात खोदलेल्या विहिरीच्या पाण्याची साधक आणि कामगार यांना जाणवलेली वैशिष्ट्ये !
१. विहीर खोदण्याचे नियोजन करणे आणि आरंभी जलतज्ञांना दाखवून ठिकाण निश्चित करणे
‘गोवा येथील एका शेतात जलतज्ञांनी विहीर खोदण्याची जागा दाखवून सांगितले, ‘‘येथे ५ मीटर खोल खोदल्यावर भरपूर पाणी मिळेल.’’ खोदकाम चालू केल्यावर त्याच दिवशी २ मीटर १० इंचावर विहिरीला पाणी लागले. दुसर्या दिवशी पाणी बाहेर काढण्यासाठी १० ‘हॉर्सपॉवर’चा (हॉर्सपॉवर म्हणजे अश्वशक्ती, इंजिनाची शक्ती मोजण्याचे परिमाण) पंप सतत चालू ठेवून विहीर ५ मीटर खोल खोदली. विहिरीतील पाणी निळ्या रंगाचे आणि पुष्कळ चैतन्यमय दिसत होते; म्हणून मी पाणी पिऊन पाहिले, तर ते स्वच्छ, शुद्ध आणि चवदार लागले. त्या वेळी मला जलदेवतेचे अस्तित्व जाणवले.’ – श्री. अमोल कुळवमोडे, उंचगाव, कोल्हापूर. (५.४.२०२१)
२. विहिरीच्या पाण्याची वैशिष्ट्ये
अ. ठेकेदार श्री. रामचंद्र गावकर म्हणाले, ‘‘मी गेली २० वर्षे विहिरी खोदण्याचे काम करतो; पण मी असे स्वच्छ आणि भरपूर पाणी कधी पाहिले नाही. ही देवाचीच लीला आहे.’’
आ. विहीर खोदणारे ४ कामगार विहिरीचेच पाणी पिण्यासाठी वापरतात. ते म्हणाले, ‘‘पाणी चांगले आणि न बाधणारे आहे’, याचा आम्ही अनुभव घेतला.’’
इ. ‘विहिरीतील पाणी स्वच्छ आणि शुभ्र असून ‘ती अगदी गंगाच आहे’, असे मला वाटले. त्या पाण्याची चव अप्रतिम आहे.’
– श्री. घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |