नाशिक येथे नियमांचे उल्लंघन करणार्या ३१ खासगी बसचालकांवर कारवाई !
नाशिक – येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघाताची पोलीस प्रशासनाकडून गंभीर नोंद घेत १४ आणि १५ ऑक्टोबर या दिवशी शहरात येणार्या ३१ खासगी बसगाड्यांच्या चालकांवर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांकडून ३१ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासगी प्रवासी वाहनमालक आणि व्यवस्थापक यांना नियमानुसार वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या.
संपादकीय भूमिकाखासगी बसचालकांच्या मनमानीला चाप बसण्यासाठी पोलिसांनी नियमितपणे वाहनांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! |