आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोव्याचे पांडुरंग नाडकर्णी यांची निवड !
सोलापूर – आंतरभारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गोवा येथील पांडुरंग नाडकर्णी, कार्याध्यक्षपदी अंबाजोगाई येथील अमर हबीब, तर कोषाध्यक्षपदी सोलापूर येथील प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. प्राचार्य सदाविजय आर्य यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन आंतरभारतीच्या विश्वस्त मंडळाने पदाधिकार्यांची निवड केली.
आंतरभारतीची स्थापना साने गुरुजी यांनी केली आहे. ही संस्था राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करते. प्राचार्य सदाविजय आर्य या संस्थेचे अध्यक्ष होते. १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यामुळे नवीन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. पांडुरंग नाडकर्णी शिक्षणक्षेत्रातील जाणकार असून त्यांनी गोव्यात कथामालेचे कार्य केले आहे. वर्ष १९७५ पासून ते आंतरभारतीशी जोडले गेले आहेत.