हिंदु राष्ट्रासाठी काळ पोषक असल्याने प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फैजपूर येथे हिंदूसंघटन मेळावा पार पडला !
फैजपूर (जळगाव), १८ ऑक्टोबर (वार्ता.) – निधर्मी, जिहादी, साम्यवादी, कथित पुरोगामी अशा सर्व देशविरोधी शक्तींनी गेली अनेक वर्षे हिंदूंचा अतोनात छळ केला आहे. भारताचे अक्षरशः लचके तोडण्याचा प्रयत्न केला आहे; पण येणारा काळ हा भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पोषक काळ असल्याने आता प्रत्येक हिंदूने त्यासाठी आपापले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ते फैजपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभ दिव्य मंगल कार्यालयात १६ ऑक्टोबर या दिवशी आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘लव्ह जिहादपासून रक्षण होण्यासाठी धर्माचरण करणे महत्त्वाचे आहे’, असे मार्गदर्शनात सांगितले.
मेळाव्याला फैजपूर आणि ग्रामीण भाग येथील शेकडोंच्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी समितीच्या २० वर्षांच्या कार्याचा आलेख मांडणारी, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे महत्त्व विषद करणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.
वक्फ कायद्याच्या विरोधात फैजपूर प्रांताधिकार्यांना निवेदन !
भूमी बळकावणे, खंडणी वसूल करणे, धर्मांतर करणे आदी षड्यंत्र राबवणार्या वक्फ बोर्डाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा उभारणे ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी मेळाव्यात ठरल्याप्रमाणे फैजपूर प्रांताधिकारी आणि उप विभागीय पोलीस अधिकारी यांना वक्फ कायदा रहित करण्याविषयी निवेदन देण्यात आले. ‘सर तन से जुदा’ या हिंसक गाण्यावर जिल्ह्यात बंदी घालण्यात यावी’, या मागणीचे निवेदनही देण्यात आले.