‘स्वीडन डेमोक्रॅट्स’ हा कट्टर मुसलमानविरोधी राजकीय पक्ष ठरला स्वीडनमधील दुसरा सर्वांत मोठा पक्ष !
‘स्वीडन डेमोक्रॅट्स’च्या समर्थनाने उल्फ क्रिस्टरसन स्वीडनचे नवे पंतप्रधान नियुक्त !
स्टॉकहोम (स्वीडन) – स्वीडन संसदेने उल्फ क्रिस्टरसन यांची स्वीडनच्या पंतप्रधानपदी निवड केली आहे. क्रिस्टरसन यांच्या ‘ख्रिश्चन मॉडरेट्स’ पक्षाला ‘लिबरल्स’ पक्षाने समर्थन दिले असले, तरी तेथील कट्टर राष्ट्रवादी आणि मुसलमानविरोधी पक्ष ‘स्वीडन डेमोक्रॅट्स’ यांचा पाठिंबाही घ्यावा लागला आहे.
UPDATE: New Swedish PM presents 3-party center-right government https://t.co/e3FE3kIa6Y
— Talk 1370 (@TALK1370) October 18, 2022
१. ११ सप्टेंबर या दिवशी स्वीडनमध्ये झालेल्या निवडणुकींचा नुकताच निकाल लागला. ८ वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या विचारसरणीच्या ‘सोशल डेमोक्रॅट्स’ पक्षाचे मागदालेना अँडरसन यांना पायउतार व्हावे लागले आहे.
२. ‘सोशल डेमोक्रॅट्स’ हा सर्वांत मोठा पक्ष ठरला असला, तरी त्याला बहुमत मिळाले नाही.
३. ३४९ जागा असलेल्या स्वीडिश संसदेत ‘सोशल डेमोक्रॅट्स’चे १०७ खासदार निवडून आले, तर ‘स्वीडन डेमोक्रॅट्स’च्या ७३ आणि ‘ख्रिश्चन मॉडरेट्स’ पक्षाच्या ६८ उमेदवारांची खासदार म्हणून निवड झाली.
४. क्रिस्टरसन यांना ‘स्वीडन डेमोक्रॅट्स’च्या मुसलमान शरणार्थींना स्वीकारण्याच्या संदर्भात कठोर धोरणे अवलंबण्यासमवेत पोलिसांना अधिक अधिकार मिळावेत, या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत.
५. स्वीडन डेमोक्रॅट्सचे नेते जिमी ऍकेसन यांनी म्हटले की, नवे शासन हे शरणार्थींच्या संदर्भातील धोरणामध्ये अमुलाग्र पालट घडवून आणणार असून ते ‘शासन’, ‘तर्क’ आणि ‘सामान्य ज्ञान’ यांच्या आधारावर असेल.
६. स्वीडनमध्ये झालेल्या निवडणूक प्रचारामध्ये ‘स्वीडन डेमोक्रॅट्स’च्या मुसलमानविरोधी शरणार्थी धोरणाला प्रथमच विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. बंदुकीद्वारे हिंसा (गन व्हायोलेंस) आणि गुंडांच्या टोळ्यांकडून होणारा हिंसाचार यांमध्ये प्रचंड वाढ झाल्यानेही ‘स्वीडन डेमोक्रॅट्स’ ला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.