शोपिया (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून ग्रेनेड फेकून २ हिंदु कामगारांची हत्या
शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथील हरमन परिसरात जिहादी आतंकवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात २ परप्रांतीय हिंदु कामगार ठार झाले, तर अन्य ३ घायाळ झाले. मनीष कुमार आणि राम सागर अशी या कामगारांची नावे आहेत. हे दोघेही उत्तरप्रदेशातील कनूज जिल्ह्यातील रहाणारे होते. या आक्रमणाचे दायित्व ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टी.आर्.एफ्.) या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतली आहे. हे आक्रमण करणार्या इमरान बशीर गनी या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे. येथील एका शेडमध्ये ५ कामगार झोपलेले असतांना त्यांच्यावर ग्रेनेड फेकण्यात आले.
जम्मू-कश्मीर के शोपियां में एक बार फिर आतंकियों ने बाहरी मजदूरों को अपना निशाना बनाया #JammuKashmir https://t.co/Q55mppIcZX
— AajTak (@aajtak) October 18, 2022
आतंकवाद्यांनी शोपियामध्येच १५ ऑक्टोबरला पूरण कृष्ण भट या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर लगेच या दोघा हिंदूंना ठार करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका
|