मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची तुलना भगतसिंह यांच्याशी केली !
क्रांतीकारकांचा अवमान करणार्या केजरीवाल यांनी क्षमा मागण्याचे भगतसिंह यांच्या कुटुंबियांची मागणी
नवी देहली – देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दारू घोटाळ्यात अडकले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) त्यांना १७ ऑक्टोबर या दिवशी घोटाळ्याशी संबंधित चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सांगितले होते. यावर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया आणि अन्य मंत्री सत्येंद्र जैन यांची थोर क्रांतीकारक भगतसिंह यांच्याशी तुलना केली. यामुळे भगतसिंह यांच्या कुटुंबियांनी अप्रसन्नता व्यक्त केली. ‘केजरीवाल यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे आणि क्षमा माघावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘केजरीवाल यांनी भगतसिंह यंच्यासह सर्व क्रांतीकारकांचा अवमान केला आहे’, असे भगतसिंह यांच्या कुटुंबातील सदस्य हरभजन दत्त यांनी म्हटले आहे.
Bhagat Singh’s family slams AAP over ‘insulting’ comparison with Manish Sisodia: ‘Arvind Kejriwal should withdraw statement’https://t.co/DxwksxLvwB
— TIMES NOW (@TimesNow) October 17, 2022
१. श्री. दत्त पुढे म्हणाले की, भगतसिंह यांनी केलेल्या कारवाया हा काही राजकीय खेळ नव्हता, तर त्यांनी देशातील जनतेसाठी त्या केल्या होत्या. राजकीय खेळी करणारा माणूस कधी फासावर जाऊ शकत नाही. भगतसिंह यांनी ब्रिटीश राजव्यवस्थेच्या विरोधात लढा दिला. हे लोक (केजरीवाल) व्यवस्थेच्या विरोधात लढत नसून सत्तेसाठी लढत आहेत.
२. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले की, भगतसिंह यांची तुलना देहलीत दारूचे ठेके वाटणार्या व्यक्तीशी करणार्या अरविंद केजरीवाल यांनी क्षमा मागावी.
३. देहलीच्या नवीन दारू उत्पादन धोरणाच्या अंतर्गत देहलीच्या आप सरकारवर १४४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी ‘सीबीआय’ ने मनीष सिसोदिया आणि इतर १४ जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराचा आरोप असणार्या मंत्र्याची तुलना थोर क्रांतीकारकाशी करणार्या आपच्या मुख्यमंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरी ! |