राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत भाजप आघाडीवर !
मुंबई – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल घोषित होण्याची प्रक्रिया १७ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भाजप ३९७ जागांवर निवडून आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या वेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाने ८१ जागा मिळवल्या. ठाकरे गटाने ८७ जागा, काँग्रेसने १०४ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसने ९८, तर अपक्षांनी ९५ जागांवर विजय मिळवला आहे. रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले यांच्या खरवली गावातील सरपंचपद हे काँग्रेसचे चैतन्य महामुनकर यांच्याकडे गेले आहे. भंडारा जिल्ह्यात १७ पैकी ११ ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला आहे. रत्नागिरीत ११ पैकी १० जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला आहे.