अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार !
मुंबई – अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेत आहोत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने उमेदवार मागे घेतला असला, तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीतून माघार घेण्याविषयी दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ‘शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीत विजयी होतील’, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.