रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
१. ‘आश्रम पाहून ‘आपण आश्रमाला आतापेक्षा अधिक साहाय्य करायला हवे आणि आपल्या सर्व कुटुंबाला आश्रम दाखवावा’, मला असे वाटले.’ – श्री. प्रमोद फडते, चिंबल, गोवा. (१७.६.२०२२.)
२. ‘आश्रम पाहून ‘हे खरेच ईश्वरी कार्य आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुनःपुन्हा यायला आवडेल.’- श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा. (१७.६.२०२२)
३. ‘मला आश्रमात यायला मिळाले’, हे मी माझे भाग्य समजतो. हा आश्रम पाहून मला पुष्कळच आनंद झाला. आजचा दिवस माझ्या सदैव लक्षात राहील.’ – श्री. मंगेश मधुकर पाटील (जिल्हाध्यक्ष, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), सिंधुदुर्ग (१७.६.२०२२)