वाराणसीत धर्मांतरासाठी प्रत्येक हिंदूला ५० सहस्र रुपयांचे आमीष !
‘सत्संग भवना’च्या नावाखाली चर्चकडून हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील चर्चमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाचे नवे प्रकरण समोर आले आहे. या चर्चच्या बाहेर ‘सत्संग भवन’ असे लिहिले आहे, तर आतमध्ये लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धर्मांतरासाठी प्रत्येक हिंदूला ५० सहस्र रुपयांचे आमीष दिल्याचेही समोर आले आहे. १६ ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘हिंदू जागरण मंच’च्या सदस्यांनी चर्चमध्ये जाऊन धर्मांतर थांबवल्याचे सांगितले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपी पाद्री छोटेलाल जयस्वाल याला हिंदु संघटनांनी पोलिसांच्या कह्यात दिले. (पाद्य्राचे नाव हिंदु कसे ? जयस्वाल याच्यासारखे बाटगे धर्मांतर करतात; मात्र स्वतःचे नाव पालटत नाहीत, हे लक्षात घ्या ! असे करून त्यांना हिंदूंमध्ये मिसळणे आणि त्यांचे धर्मांतर करणे सोपे जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक) या प्रकरणी अन्वेषण करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
Varanasi: “50 हजार रुपए लो और ईसाई बनो” महादेव की नगरी में धर्म परिवर्तन का नया मामला, बाहर https://t.co/MOdSIuhBQF
— The Front Face India (@frontfaceindia) October 17, 2022
१. ही घटना वाराणसी ग्रामीण भागातील फुलपूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. येथे ‘सर्व इंडिया मिनिस्ट्री’ नावाचे एक चर्च आहे. या चर्चमध्ये छोटेलाल जयस्वाल नावाची व्यक्ती पाद्री म्हणून कार्यरत आहे.
२. हिंदू संघटनांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पाद्य्राने धर्मांतरासाठी हिंदु धर्मातील लोकांना प्रति व्यक्ती ५० सहस्र रुपये देण्याचे वचन दिले होते. त्यासाठी छोटेलाल याने २ सहस्र रुपये आगाऊ दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
३. १६ ऑक्टोबरला धर्मांतराच्या कटाचा एक भाग म्हणून सर्वांना चर्चमध्ये येण्यास सांगितले होते. याविषयीची माहिती मिळताच हिंदु संघटनांच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन छोटेलाल याला हिंदूंचे धर्मांतर करण्यापासून रोखले. याविषयीचा एका व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
(सौजन्य : Nitin Shukla Latest video)
संपादकीय भूमिकाचर्चच्या हिंदुविरोधी कारवाया पहाता भारतातील प्रत्येक चर्चचे सर्वेक्षण करून अशा कारवाया करणार्या चर्चना टाळे ठोकणे आवश्यक ! |