वर्धा येथे वक्फ कायदा आणि हलाल प्रमाणपत्र यांच्या विरोधात ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !
वर्धा, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – अमर्याद अधिकार असलेला वक्फ कायदा रहित करावा, तसेच ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतात समांतर अर्थव्यस्था निर्माण करण्याचा प्रयत्न बंद व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १७ ऑक्टोबर या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना सोपवण्यात आले. या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.