परीक्षेच्या वेळी तपासणीसाठी हिजाब काढण्यास सांगितल्यावर विद्यार्थिनींनी केली ओरड !
-
मुझफ्फरपूर (बिहार) येथील घटना
-
(म्हणे) ‘शिक्षकाने आम्हाला राष्ट्रद्रोही संबोधून पाकमध्ये चालते व्हा’, असे सांगितले !’
-
प्राचार्या आणि शिक्षक यांनी सर्व आरोप फेटाळले !
मुझफ्फरपूर (बिहार) – इस्लामी देश इराणमध्ये हिजाबच्या (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलने चालू आहेत. धर्मनिरपेक्ष भारतात मात्र हिजाबचे समर्थन केले जात आहे. येथील महंत दर्शन दास महिला कॉलेजमध्ये अकरावीची परीक्षा चालू असतांना हिजाब परिधान केलेल्या काही विद्यार्थिनींवर त्यांनी कानात ‘ब्लूटूथ’ लावले नाही ना, हे तपासण्यासाठी त्यांना हिजाब काढायला सांगितल्याने त्यांनी परिक्षेवर बहिष्कार टाकला. या वेळी त्यांनी शिक्षक शशीभूषण यांच्या विरोधात अनाठायी आरोप करत म्हटले, ‘शिक्षकाने आम्हाला ‘राष्ट्रद्रोही’ संबोधून पाकिस्तानमध्ये चालते व्हा’, असे सांगितले. कॉलेजच्या प्राचार्या आणि शिक्षक शशीभूषण यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ही घटना अत्यंत दुर्दैवी अन् धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
बिहार के मुजफ्फरपुर में हिजाब विवाद के बाद आपको यह वीडियो देखनी चाहिए।
जो मुस्लिम लड़कियां शिक्षक पर आरोप लगा रही थीं, वो स्कूल भी कम आती हैं।
उसी क्लास की हैं आयाम फातिमा, जो उन लड़कियों की पोल खोल रही हैं।
देश को बदनाम करने की यह सुनियोजित साजिश है।@KapilMishra_IND pic.twitter.com/7dqpIHQxht
— Prachi Priyam (@heyprachi) October 17, 2022
कॉलेजच्या प्राचार्या डॉ. कनुप्रिया यांनी सांगितले की, विद्यार्थिनींचे असे वर्तन वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे. या कॉलेजचा इतिहास अत्यंत जुना आहे. विद्यार्थिनींना भ्रमणभाष आणि ब्लूटूथ बाजूला करण्यासाठी सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी या प्रसंगाला धर्माशी जोडून गोंधळ घालण्यास आरंभ केला. हे अत्यंत लज्जास्पद आहे.
प्राचार्या पुढे म्हणाल्या की, आधीच या विद्यार्थिनींची हजेरी ७५ टक्क्यांहूनही अल्प आहे. अशा विद्यार्थिनींना परिक्षेला बसू देऊ नये, असे विद्यापिठाने सांगितले आहे, तरी या विद्यार्थिनी विनाकारण दबाव बनवत आहेत जेणेकरून कॉलेजचे व्यावस्थापन त्यांच्यासमोर झुकेल. या विद्यार्थिनी निराधार कथानक रचत आहेत. शाळेत धार्मिक भेदभाव कधीच होत नसून या मुसलमान विद्यार्थिनींना धर्म आणि हिजाब यांच्या नावाने कुणीतरी उकसवत आहे. शिक्षक शशिभूषण यांनी सांगितले की, या विद्यार्थिनींनी सांगितले की, त्या एक वेळ परीक्षा देणार नाहीत; परंतु हिजाब काढून त्यांचे कानही दाखवणार नाहीत.
आप जानते हैं ये कौन है? किस संगठन के लिए काम करता है ये ? बिहार तक पहुंचे मुजफ्फरपुर के महंत दर्शन दास महिला काॅलेज में हिजाब विवाद के बीच ये क्या कर रहा है?
नोट: कुछ सूत्रों की माने तो ये व्यक्ति एक संगठन का सक्रिय सदस्य है जो एक धर्मविशेष की पैरवी करते है। pic.twitter.com/30msskoCNs
— Bihar Just In (@BiharJustin) October 16, 2022
संपादकीय भूमिका
|