‘जेवण पचत नाही’, असे सांगून सोडून देऊ नका, तर उत्तम पचनशक्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७४
‘पोळी पचत नाही. वांगे खात नाही. टॉमेटो चालत नाही. कोबी आवडत नाही. कडधान्य घशातून खाली उतरत नाही’, इत्यादी किती दिवस म्हणत रहाणार ? यातून बाहेर पडण्यासाठी उत्तम पचनशक्ती निर्माण व्हायला हवी. ती निर्माण होण्यासाठी दिवसातून केवळ २ वेळा आहार घ्या. अधेमधे भूक लागल्यास १ – २ चमचे तूप खा आणि नियमित न्यूनतम ३० मिनिटे व्यायाम करा.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)