ब्रिटनमधील संघटित हिंदु संघटना !
इस्लामी देशांमध्ये हिंदूंवर आक्रमणे होत आहेत, त्यांचा वंशसंहार होत आहे, हे जगजाहीर आहे. त्यातही याविषयी भारत सरकार आणि भारतातील हिंदू अन् त्यांच्या संघटना विशेष काही करत आहेत, असेही अनेक वर्षांत दिसून आलेले नाही. इस्लामी देशांमध्ये मुसलमान बहुसंख्य असल्याने ते हिंदूंवर अत्याचार करतात. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या भारतीय उपखंडातील इस्लामी देशांमध्येच हिंदूंचा वंशसंहार होत आहे; कारण येथे पूर्वीपासूनच हिंदूंचे अस्तित्व होते, तर अन्य इस्लामी देशांत, उदा. सौदी अरेबिया, इराण, इराक येथे हिंदू पूर्वीच नष्ट झालेले आहेत. तेथे आता केवळ नोकरी, व्यवसाय यानिमित्त गेलेलेच हिंदू रहात आहेत. त्यांना तेथील इस्लामी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागत आहे. त्यातही ‘केंद्रात मोदी सरकार आल्यापासून या हिंदूंची स्थिती काही प्रमाणात तरी चांगली झाली आहे’, असे म्हणायला वाव आहे. दुसरीकडे जो देश मुसलमानबहुल नाही, तेथेही आता मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे होऊ लागली आहेत. हा देश म्हणजे ब्रिटन होय. ब्रिटनच्या लिसेस्टर आणि बर्मिंगहॅम या शहरांमध्ये काही आठवड्यांपूर्वी हिंदूंवर मुसलमानांकडून आक्रमणे झाली. याला निमित्त होते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्याने संतप्त झालेल्या पाकवंशीय मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. त्यांचा राग संपलेला नव्हता. काही दिवसांनी पुन्हा त्यांच्याकडून आक्रमण करण्यात आले. दोन्ही वेळेला ब्रिटीश पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. एरव्ही जगाला शहाणपण शिकवणार्या ब्रिटनचे पोलीस किती पक्षपाती आणि निष्क्रीय आहेत, हे जगाने पाहिले. पोलिसांनी नंतर कारवाई करत काही जणांना अटक केली. तसेच एकाला एका वर्षाची शिक्षाही ठोठावली, हा भाग जरी असला, तरी जो धाक मुसलमानांवर निर्माण व्हायला हवा होता, तो निर्माण झालेला नाही. त्यामुळे ‘भविष्यात पुन्हा अशा प्रकारची आक्रमणे होणार नाहीत’, असे म्हणता येणार नाही. ब्रिटनमध्ये जगभरातील नागरिक रहात आहेत. त्यात भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांचे मुसलमानही आहेत. पाकिस्तान भारताचा पारंपरिक शत्रू असल्याचे ब्रिटनमध्येही दिसून येते, हे काही नवीन नाही. याकडे पहाता ब्रिटनचे पोलीस आणि सरकार यांनीही याकडे गांभीर्याने पहात त्यावर लक्ष ठेवून दोघांमध्ये संघर्ष होणार नाही, याची काटेकोरपणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
तसे होत नसल्यानेच ब्रिटनमधील १८० हून अधिक भारतीय आणि हिंदु संघटना यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. यात त्यांना ब्रिटनमध्ये भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. जगातील सर्वांत जुनी लोकशाही असलेल्या आणि जगातील बहुतेक देशांवर राज्य करणार्या ब्रिटनमधील हिंदु नागरिकांना जेव्हा असे वाटते, तेव्हा त्याकडे जगाने अन् ब्रिटन सरकारनेही गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत’, असा कथित आरोप करणार्यांच्या सुरात सूर मिळवण्यामध्ये पाश्चात्त्य देश नेहमीच पुढे असतात. अमेरिकेसारखी महासत्ताही यात मागे नाही. अशा वेळी जेव्हा अशा देशांपैकी एक असणार्या ब्रिटनमध्ये ‘हिंदू असुरक्षित आहेत’, असे समोर येत असेल, तेव्हा ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जगासमोर येऊन यावर बोलणे आवश्यक आहे. ब्रिटनने जगावर राज्य करतांना किती नरसंहार, अत्याचार केले आहेत, याची गणतीच करता येणार नाही. अशा देशाने त्याच्या देशात हिंदूंवर आक्रमणे होत आहेत, हे पहाता त्यांचे रक्षण केले पाहिजे, असे चित्र जगासमोर येणे आवश्यक आहे.
भारतात हिंदू असुरक्षित !
‘ब्रिटनमध्येही तेथील राजकीय पक्ष मुसलमानांची मते मिळवण्यासाठी त्यांचे लांगूलचालन करत आहेत’, असेही आता म्हटले जात आहे. त्यामुळे मुसलमानांपेक्षा हिंदूंची मते अल्प असल्याने त्यांना अल्प महत्त्व दिले जात आहे, असेही दिसून येत आहे. भारतात मुसलमानांनी आक्रमण केले, तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याच प्रमाणे ‘ब्रिटनमध्येही हिंदूंवर आक्रमण झाले, तर राजकीय पक्ष मौन बाळगून आहेत’, हे चित्र दिसत आहे. यामुळे मुसलमानांना अधिक चेव आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यातही आता तेथील भारतीय आणि हिंदु संघटना यांनी जे धाडस दाखवून पंतप्रधानांना पत्र लिहिले, तसे धाडस भारतातील हिंदूंच्या संघटनांनी कधी केल्याचे आठवत नाही.
‘भारतातील हिंदूंच्या संघटना कधीही संघटितपणे हिंदूंसाठी काही करत आहेत’, असे चित्र फारच दुर्मिळ आहे. त्या तुलनेत ‘ब्रिटनमधील हिंदूंच्या संघटना एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि त्या त्यांच्यावरील आक्रमणासाठी संघटित होऊन सरकारकडे आवाज उठवत आहेत, हे भारतातील हिंदूंसाठी आणि त्यांच्या संघटनांसाठी आदर्श आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. भारतात आताही केंद्रात आणि काही राज्यांत भाजपचे सरकार असतांना हिंदू देशात सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या दिवासाढवळ्या हत्या होत आहेत, त्यांचा शिरच्छेद केला जात आहे. अशा वेळी त्यांच्या रक्षणासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘हिंदूंच्या संघटनांना सांगावे लागू नये’, असे कुणालाही वाटेल. काँग्रेसच्या काळात हिंदूंना लक्ष्य करून जिहादी आतंकवादी बाँबस्फोट घडवत होते, तो भाग तरी सध्या बंद झाला असला, तरी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे मात्र तशीच चालू आहेत. लव्ह जिहादविषयी काही राज्यांनी कायदे केले असले, तरी तो काही थांबलेला नाही; कारण मुसलमान कायद्यांना घाबरतात आणि गप्प रहातात, असे कधीही दिसलेले नाही; कारण देशात ते अल्पसंख्य असले, तरी त्यांच्यातील बहुतांश जण जिहादी कारवाया करतात, गुन्हेगारी कृत्ये, उदा. हत्या, बलात्कार, तस्करी, गोहत्या, चोर्या आदी यांत त्यांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. आतातर लँड जिहाद हेही एक गुन्हेगारी कृत्य समोर आले आहे. हलाल प्रमाणपत्राद्वारे उघडपणे भारतीय अर्थव्यवस्थेवर आक्रमण करण्यात आले आहे. अशा वेळी ‘हिंदूंना या देशात भीती वाटत आहे’, असे जर कुणी म्हटले, तर ते चुकीचे कसे ठरेल ?
भारतच नव्हे, तर जगभरात हिंदू असुरक्षित आहेत, हीच वस्तूस्थिती असून त्यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने पावले उचलावीत ! |