अभिनेत्री मनवा नाईक यांना ‘उबेर’ कॅबचालकाकडून धमकी !
दोषीवर कारवाई करण्याचे मुंबईच्या सहपोलीस आयुक्तांचे आश्वासन !
मुंबई – मराठी चित्रपट निर्माती तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक यांना ‘उबेर’ कॅबचालकाने १५ ऑक्टोबरच्या रात्री धमकावले. मनवा यांनी या घटनेची माहिती फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘दोषीवर लवकरच कारवाई करू’, असे यावर म्हटले आहे.
१. १५ ऑक्टोबरच्या रात्री घरी जाण्यासाठी मनवा यांनी ‘उबेर’ टॅक्सी नोंदवली. प्रवासामध्ये चालक अनेकदा भ्रमणभाषवर बोलत होता. याविषयी जाणीव करून देऊनही तो ऐकत नव्हता.
२. त्याने एका ठिकाणी सिग्नलचेही उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्याची गाडी अडवली आणि गाडीचे छायाचित्र काढले. तेव्हा तो पोलिसांशी हुज्जत घालू लागला. मनवा यांनी त्याला सोडण्याविषयी विनंती केल्यावर पोलिसांनी त्याला जाऊ दिले; मात्र तरीही तो चालक मनवा यांच्याशी उद्धटपणे बोलून त्यांना धमकावत होता. ‘थांब तुला पहातोच’, असेही तो म्हणाला.
३. मनवा यांनी या प्रकाराविषयी ‘उबेर सेफ्टी’ला संपर्क केला; पण तेथून काहीच साहाय्य मिळाले नाही.
४. नंतर त्याने अचानक गाडी चुनाभट्टीच्या दिशेने वळवली आणि कुणाला तरी संपर्क केला. त्यामुळे मनवा यांनी आरडाओरडा केला. २ दुचाकीस्वार आणि रिक्शाचालक यांनी गाडी थांबवून मनवा यांची सुटका केली.
संपादकीय भूमिकामहिलांसाठी मुंबई असुरक्षितच ! |