कुतूबमिनार नव्हे, तर मेरुस्तंभ, म्हणजेच वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा !
‘नुकतीच देहलीतील साकेत न्यायालयात कुतूबमिनारवर स्वामित्वाच्या अधिकाराविषयी एक याचिका प्रविष्ट झाली. त्याविषयी न्यायालयात १७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी सुनावणी आहे. खरेतर अनेकदा मुसलमान कुतूबमिनारवर त्यांचा हक्क सांगतात; पण प्रत्यक्षात कुतूबमिनार कुणी बांधला ? तो नेमका काय आहे ? याविषयीच्या माहितीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
आचार्य वराहमिहीर अनेक वेधयंत्र आणि वेधशाळा यांचे निर्माते होते. येथे एक गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे की, देहलीच्या मिहरौलीमध्ये असलेला मेरुस्तंभ वराहमिहीर यांची अद्भुत वेधशाळा होती. यासाठी आपल्याला त्याच्या निर्मितीची आवश्यकता, निर्मितीचा कालावधी, त्याची रचना यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. १५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात क्रूरकर्मा कुतुबुद्दीनने हिंदूंचा वंशविच्छेद करणे आणि मंदिरांचा विध्वंस करून तेथे मशिदी बांधणे, एकाही इतिहासकाराने कुतूबमिनार बनवल्याचे श्रेय कुतुबुद्दीनला न देणे, कुतूबमिनारच्या परिसरात जगातील सर्वाधिक शुद्ध ‘पिटवा’ लोखंडाच्या माध्यमातून ‘गरुडस्तंभ’ उभारण्यात येणे आदी सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/620235.html
९. ख्रिस्ताच्या १४ व्या शतकाच्या अंतापर्यंत, म्हणजेच फिरोजशाह तुघलकाच्या काळापर्यंत कुतूबमिनारला हिंदु इमारत समजली जाणे
भारत सरकारच्या पुरातत्व विभागाचे हे एक उदाहरण पूर्णपणे आश्चर्यकारक आहे आणि महत्त्वपूर्ण आहे; कारण हे या शोधपत्राला पुढे नेण्यासाठी दीपस्तंभाचे कार्य करत आहे. कुतूबमिनारच्या तिसर्या मजल्यावर एक अभिलेख आढळून येतो. त्यात ‘पिरथी निरप: स्तम्भ, मलिकदीन कीरतिस्तम्भ सुलत्राण उल्लाउद्दीन की जय
स्तम्भ ।’, असे म्हटले आहे.
येथे ‘पिरथी निरप:’ स्तंभावरून केवळ महाराजा पृथ्वीराज चौहान यांचा उल्लेख अभिप्रेत आहे, ज्यांचा शासनकाळ वर्ष ११७५ ते ११९३ पर्यंत होता. हा अभिलेख सर्व मुसलमान शासकांच्या निर्मितीच्या संदर्भात सर्व दाव्यांना खोटे ठरवतो. सुप्रसिद्ध पुरातत्ववेत्ते आणि न्यायाधीश आर्.बी. कंवर सेन यांच्या मतानुसार हिंदु स्थापत्य कलेचे अनुपम उदाहरण हा ‘जय स्तंभ’ चौहान वंशीय सम्राट विशालदेव विग्रहराज याने त्याच्या देहलीच्या विजयाच्या वेळी बनवला. कुतूबमिनारच्या ५ व्या मजल्याच्या प्रवेशद्वारावर एक अभिलेख आढळून येतो. सर्व मुसलमान शासकांच्या खोट्या दाव्यांचे खंडण करत या इमारतीचे खरे नावही सांगतो. त्यामुळे तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे. हा अभिलेख आजही स्पष्टपणे वाचता येतो.
‘ओ स्वस्ति श्री सुरित्राण फेरोजशाहि विजयराते संवत् १४२५ वरिष्ठ फाल्गुण सुदि ५ शुक्रदिने मुकरो जीर्णाेद्धार कृतं श्री विश्वकर्माप्रासादे सुत्रधारी चाहडदेवपाल सुतदोहित्र सुत्रपाल: प्रतिष्ठा निष्पातित उदैगज ९२’
या अभिलेखात कुतूबमिनारला ‘विश्वकर्मा प्रासाद’ संबोधण्यात आले आहे. यात ही गोष्ट स्पष्ट झाली की, ख्रिस्ताच्या १४ व्या शतकाच्या अंतापर्यंत फिरोजशाह तुघलकाच्या काळापर्यंत या विशाल इमारतीला मुसलमानांची कृती समजण्यात येत नव्हते, तर हिंदु इमारत समजली जात होती. चाहडदेवपालचा मुलगा के दोहित्र याने वर्ष १४ फेब्रुवारी १३७० या दिवशी या इमारतीचा जीर्णाेद्धार आणि प्रतिष्ठापना केली.
१०. कुतूबमिनारची मेरुपृष्ठीय किंवा श्रीयंत्रासारखी कमळाच्या पाकळ्यांसारखी शोभिवंत बनावट हे हिंदु वास्तूकलेचे अनुपम उदाहरण !
वास्तूकलेच्या दृष्टीने एक पक्षी बनून कुतूबमिनारच्या शेवटच्या मजल्यावर लोखंडी स्तंभावर चढून खाली पाहिले, तर कुतूबमिनारची बनावट स्पष्टपणे मेरुपृष्ठीय किंवा श्रीयंत्रासारखी कमळाच्या पाकळ्यांसारखी शोभिवंत आहे. सर्वांत खाली १६ गज खोल आणि १६ गज रूंद घेरा असणारे कमलकर्णिका आहे. नंतर एका कमळात दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे कमळ निघतांना दिसून येते. हे हिंदु वास्तूकलेचे अनुपम उदाहरण आहे. मिनारच्या १२ दिशांना १२ राशी आणि ७ खंड ७ स्वर्ग दर्शवते. काही विद्वानांनी भागवत् महापुराणाप्रमाणे या कुतूबमिनारप्रमाणे हुबेहूब मेरुपर्वंताच्या नमुन्यापासून स्थापन केले आहे आणि श्लोकामध्ये ‘योजन’चे वर्णन ‘गजा’च्या मापाने मोजले आहे.
११. मुसलमान स्वरूप देण्यासाठी मेरुस्तंभाच्या चारही बाजूंनी कुराणाची आयते कोरण्यात येणे
अरबी भाषेत ध्रुवाला ‘कुतूब’ आणि स्तंभाला ‘मिनार’ म्हणतात. संस्कृत भाषेत ‘ध्रुवा’ला ‘मेरु’ही म्हणतात. शेवटी कुतूबमिनार हे मेरुस्तंभाचाच अरबी अनुवाद आहे. याला मुसलमान कृती सिद्ध करण्यासाठी मुसलमानांनी मेरुस्तंभाच्या चारही बाजूंनी कुराणाची आयते आणि अन्य मुसलमान सुलतानांची खोटी प्रशंसा कोरली, जेव्हा की मुसलमान इतिहासकार सर सैय्यद यांनी प्रामाणिकपणाने ‘असर-उस-संद्दी’मध्ये लिहिले, ‘हे मिनार मुसलमान कृती नसून राजपूत काळात बांधलेले एक हिंदु भवन आहे.’ हिंदु वास्तूकलेप्रमाणे प्रत्येक मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असते. ज्या दिशेने सूर्य उगवतो, त्याच दिशेने देवतांच्या मूर्ती असतात. मुसलमान स्थापत्य कलेनुसार मशिदीचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असते, तसेच ‘एक मुसलमान काबा (पश्चिम दिशेने) तोंड करूनच नमाजपठण करील’, ही इस्लामिक वास्तूकलेची अनिवार्य अट आहे; परंतु कुतूबमिनार तर पश्चिमाभिमुख नाही.
१२. वेधशाळा आणि छायाप्रमाण यांनुसार मेरुस्तंभ असल्याचे सिद्ध होणे
आतापर्यंत हे स्पष्ट आहे की, ही काही इस्लामिक इमारत नाही. या ठिकाणी कोणत्याही उत्कृष्ट मंदिराची लक्षणे दिसून येतात. रात्रीला दिशा-बोध होण्यासाठी सप्तर्षींना बघण्यासाठी, ग्रह आणि उचित लग्नांना योग्य प्रकारे समजण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ध्रुव तार्याचा आश्रय घ्यावा लागतो. अशा स्थितीत ज्योतिष नियमांप्रमाणे सर्व वेधशाळांची प्रवेशद्वारे आणि झरोके उत्तराभिमुख असतात. हे मिनारही उत्तराभिमुख आहे, म्हणजे ही एक वेधशाळा आहे.
ज्योतिष सिद्धांतानुसार प्राचीन जंतरमंतर आणि देहली येथील कर्म-क्लय यंत्रांप्रमाणे या मिनारचा कल दक्षिणेकडे राहिलेला आहे. याचे मुख्य कारण हे आहे की, २१ जून या दिवशी जेव्हा वर्षाचा सर्वांत मोठा दिवस असतो, तेव्हा दुपारी १२ वाजता या विशाल मिनारची सावली भूमीवर पडत नाही. याचा तज्ञांनी शोध घेतला आणि २१ जून १९७० या दिवशी विविध प्रसिद्ध पत्रकार अन् ज्योतिष तज्ञ यांच्या एका चमूने व्यावहारिक दृष्टीने याचे परीक्षण केले. तेव्हा त्यात तथ्य असल्याचे लक्षात आले. ज्याची वृत्ते अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.
२१ जून या दिवशी त्याची पृथ्वीवर सावली न पडण्याचे कारण आहे की, २१ जून या दिवशी सूर्य मध्यरेखेपासून २३-३० डिग्रीने उत्तरेला असतो. मेरुस्तंभाचा अक्षांश २८-३०-३८ डिग्री आहे. मध्यरेषेच्या निर्माणकाळात त्याचा कल ५-१-२८ डिग्री दक्षिणेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे त्याची सावली त्या दिवशी पृथ्वीवर पडत नाही. सर्वांत लहान दिवशी म्हणजेच २३ डिसेंबर या दिवशी या मिनारची सावली तिप्पट सर्वाधिक लांब दिसून येते. या दिवशी या सावलीचे माप २८० फूट नोंदवण्यात आले आहे. या पुराव्यानेच स्पष्ट होते की, कुतूबमिनार प्राचीन ‘पंचसिद्धांतिकां’च्या शैलीवर निर्मित वराहमिहीर यांची वेधशाळाच आहे आणि दुसरे काही नाही.
१३. मेरुस्तंभाचा (तथाकथित कूतुबमिनारचा) वराहमिहीर यांच्याशी विविध प्रकारे संबंध असणे
१३ अ. मिहरौली म्हणजे आचार्य वराहमिहीर रहात असलेले स्थान ! : मेरुस्तंभ मिहरौलीमध्ये आहे. मिहरौली हा अपभ्रंश शब्द आहे. शुद्ध शब्द आहे, ‘मिहिर+आलय = मिहिरालय’. अर्थात् आचार्य वराहमिहीर रहात असलेल्या स्थानाला ‘मिहिरालय’ म्हटले गेले आहे. डॉ. डी.एस्. त्रिवेदी यांची व्याख्या याहून वेगळी आहे. ते शुद्ध शब्द ‘मिहिरावली’ मानतात. मिहीरचा अर्थ आहे सूर्य आणि अवलीचा अर्थ आहे रांग, जसे दीप-अवली = दीपावली. त्याचप्रमाणे मिहिरावलीचा अर्थ होतो, ‘सूर्यादी नक्षत्रे पहाणारी वेधशाळा’ आणि येथे हाच अर्थ अभिप्रेत आहे. यात अधिक खोलात गेले, तर विश्लेषक भरत यांच्यानुसार सूर्यासारखी तेजस्वी बुद्धी असणार्या व्यक्तीला ‘मिहीर’ म्हणतात. विश्वातील अद्भुत हिंदु स्थापत्य कलेने ओतप्रोत या गौरवशाली वेधशाळेच्या निर्मितीच्या मागेही विश्वाचा अद्वितीय आणि विलक्षण मेंदू राहिला असेल.
१३ आ. मेरुस्तंभ वराहमिहीर यांच्याखेरीज अन्य कुणीही बनवलेला नसणे : २१ जून १९८४ या दिवशी माझे गुरुदेव डॉ. भोजराज द्विवेदी हे त्यांचे समकक्ष विद्वान सहकारी पंडित जगन्नाथ भसीन, पंडित जगन्नाथ भारद्वाज, पंडित सत्यवीर शास्त्री आणि महान वीर थुल्ली यांच्या समवेत कुतूबमिनारचे निरीक्षण करण्यासाठी गेले होते. त्या सर्वांना मिनारच्या चारही बाजूंनी सुकलेल्या तलावासारखे विशाल अंगण दिसून आले. वस्तूत: एका अतिशय मोठ्या तलावाच्या मधोमध हा स्तंभ बनवण्यात आला होता. जेणेकरून रात्री तलावाच्या निर्मळ जलामध्ये ग्रह-नक्षत्रांचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून येईल, तसेच दिवसा सूर्याच्या प्रतिबिंबाच्या आधारे डोळ्यांवर जोर न देता सूर्याचा वेध घेता येईल. निश्चितच हे नियोजन मिहिराचार्य यांच्याखेरीज अन्य कुणाचे असूच शकत नाही. पंडित मायाराम यांनी स्पष्टपणे म्हटले की, ही वेधशाळा वराहमिहीर यांचीच होती.
१३ इ. मेरुस्तंभच वराहमिहीर यांचे विश्वविद्यालय आणि वेधशाळा असणे : लग्नाचा उदयास्त पहाण्यासाठी, सूर्य-चंद्रादी ग्रहांचे नेमके उदय-अस्तकालीन वेळांच्या गणनेसाठी, ग्रहांची युती, प्रति-युति, श्रंगोन्नती आणि परस्पर युद्ध पहाण्यासाठी त्या शहराच्या सर्वांत उंच पठारी भागावर जाऊन पहावे लागते. कुतूबमिनारची उंची १०६ फूट असण्यामागील हेच कारण आहे. जर याला कुतूहल किंवा विलास (सुख) यांसाठी बनवण्यात आले असते, तर त्यात या प्रकारची सुविधा आणि आनंद घेण्यासाठी एखादी जागा निश्चितच असेल; परंतु तसे नाही. याचा अर्थ हा मेरुस्तंभच वराहमिहीर यांचे विश्वविद्यालय आणि वेधशाळा आहे. बृहत् संहितेतील व्रजलेपाध्याय ५७ मधील श्लोक १ ते ८ च्या अंतर्गत धातूसंघ आणि व्रजलेपाचे विधी सांगण्यात आले आहेत, ज्यात १ कोटी वर्षांपर्यंत देवप्रासाद, प्रतिमा, खांब आणि विहिरी यांना खराब होऊ देत नव्हती. बहुतेक हेच तंत्रज्ञान (गरुडध्वज) लोहस्तंभामध्ये अविरत झाले आहे.
१३ ई. मेरुस्तंभाच्या निर्मितीमध्ये वरामिहीर यांनी विविध तंत्रांचा उपयोग करणे : पंचसिद्धांतिकाच्या अध्याय १३ मधील श्लोक १० आणि ११ मध्ये म्हणण्यात आले आहे की, वर्षातील ६ मोठ्या दिवसांमध्ये दुपारच्या १२ वाजता सूर्य क्षितिजाच्या सर्वाेत्तम उंचीवर असेल, तेव्हा उच्च इमारतींच्या सावल्या पृथ्वीवर पडत नाहीत. त्याप्रमाणे ते ५ अंश दक्षिणेकडे वाकले आहे. इमारतींच्या सावल्यावरून वर्षाच्या सर्वांत मोठ्या दिवसाचा वेध व्यावहारिक परीक्षणाच्या आधारावर करण्यात येत होता. या सूत्राचे वर्णन वराहमिहीर यांना सोडून कोणताही प्राचीन ग्रंथ जसे नारदसंहिता, गर्गसंहिता, बृहत् पराशर, होराशास्त्र, भृगुसंहिता, आर्यभट्टीय, सत्यजातकम् बृहद्यवनजातक इत्यादींमध्ये मिळत नाही. वराहमिहीर यांनी या तंत्राचा उपयोग मेरुस्तंभाच्या निर्मितीमध्ये संपूर्णपणे केला आहे की, जे प्रत्यक्ष घेतलेल्या परीक्षांनी प्रमाणित आहे.
१४. मिहरौलीमध्ये असलेला मेरुस्तंभच हा वराहमिहीर यांची वेधशाळा असणे
‘पंचसिद्धांतिका’मध्ये वराहमिहीर यांनी परत परत ‘मेरुपवर्ता’चे वर्णन केले आहे. हा मेरुपर्वत मेरुस्तंभच असू शकतो. बृहत् संहितेमध्ये प्रासादलक्षणाच्या अध्यायामध्येही वराहमिहीर यांच्या सर्वांत पहिले ‘मेरुप्रासाद’ बनवण्याचा विधी दिला आहे. वास्तूशास्त्रामध्ये प्रखर ज्ञाता गुप्तकाल यांनीही ‘वराहमिहीर यांच्यासारखे दुसरे कुणी झालेले नाही. हा स्तंभ ख्रिस्तपूर्वीची निर्मिती आहे आणि निश्चितच वराहमिहीर त्याच्या पूर्वी झाले होते. अंतिमत: या मेरुस्तंभाच्या माध्यमातून आपल्याला वराहमिहीर यांचे निवासस्थान, त्यांचे कार्यक्षेत्र, तंत्र, त्यांची प्रतिभा आणि त्यांच्या काळाचा प्रबळ संकेत मिळतो.’ या सर्व प्रबळ पुराव्यांवरून हे सप्रमाण सिद्ध होते की, मिहरौलीमध्ये असलेला मेरुस्तंभच हा वराहमिहीर यांची वेधशाळा होती.’
– ज्योतिषी डॉ. जितेंद्र व्यास, जोधपूर, राजस्थान. (१ ऑक्टोबर २०१२)
(‘काश्मीर विद्यापीठ, श्रीनगर’ येथे ऑक्टोबर २०१२ मध्ये झालेल्या ४६ व्या ‘ऑल इंडिया ओरिऐंटल कॉन्फरन्स’मध्ये सादर केलेला शोधनिबंध)
संपादकीय भूमिकाकुतूबमिनार हा ‘मेरुस्तंभ’ असल्याचे अनेक पुरावे असतांना सरकार त्याला तसे घोषित का करत नाही ? |