शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंबादास दानवेंसह इतर नेते आणि कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता !
संभाजीनगर – केंद्र सरकारच्या धोरणामुळे महागाईत प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ कोरोना महामारीच्या काळात येथे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत मोर्चा काढून जाहीर सभा घेतली होती. पोलिसांची अनुमती नाकारूनही मोर्चा काढल्याच्या प्रकरणी आणि कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी, आमदार उदयसिंह राजपूत, संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी या नेतेमंडळींची मुख्य न्यायदंडाधिकारी वाय.पी. पुजारी यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी निर्दोष मुक्तता केली आहे.