मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई – मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची एक ध्वनीचित्रफीतही प्रसारित होत असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार चालू आहेत.
‘माझ्या समाजाची हानी होईल, असे मी आतापर्यंत काहीही केलेले नाही. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. या ध्वनीफीतीमुळे माझी अपकीर्ती होत आहे आणि अपकीर्ती करणार्यांवर गुन्हे नोंद करावेत’, असे म्हणत फेसबूकद्वारे थेट चित्रीकरण (लाईव्ह) करत रमेश केरे यांनी विष प्यायले.