‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे यांना स्फुरलेल्या कविता !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड – १’ या ग्रंथातील छायाचित्रे पहातांना ‘साधकांच्या ठिकाणी मीच आहे’, असे अनुभवत होते. तेव्हा माझा गुरुदेवांशी संवाद चालू झाला. त्यांच्याच कृपेने मला सुचलेल्या भावओळी पुढे दिल्या आहेत.
कृष्णभेटीचा आनंद ।
आपले दर्शन होता ।
साधक होती मुग्ध ।।
मुखावरी सर्वांच्या विलसे ।
कृष्णभेटीचा आनंद ।। १ ।।
भावभेटीचा आनंद आगळा ।
भगवंत अवतरले भूवरी ।।
याची देही, याची डोळा दर्शन दिधले ।
तृप्त झाली आमुची मने ।। २ ।।
सूक्ष्मस्पर्श अनुभवता श्री गुरूंचा ।
स्पर्श (सूक्ष्मातून) अनुभवता श्री गुरूंचा ।
वात्सल्य अनुभवण्या उमले देहातील प्रत्येक पेशी ।।
मनी दाटतो कृतज्ञताभाव ।
अन् ‘धन्य धन्य झालो गुरुराया’ येतसे मुखी ।। १ ।।
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (१५.५.२०२२)
|