तुम्ही राष्ट्रप्रेमी असाल, तर ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – शरद पोंक्षे यांचे आवाहन
हलाल प्रमाणित उत्पादनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आतंकवाद्यांच्या समांतर अर्थव्यवस्थेचा धोका ओळखा !
मुंबई – अमेरिकेच्या अणूहल्ल्यात बेचिराख झालेल्या जपानच्या नागरिकांनी नंतर अमेरिकेचे एकही उत्पादन विकत घेतले नाही. तुम्ही राष्ट्रप्रेमी असाल, तर एकच करा, ‘हलाल’चे चिन्ह असलेले कोणतेही उत्पादन खरेदी करू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. १४ ऑक्टोबरला नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विहिंपचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, ‘सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष संतोष कानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्यवाह उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पोंक्षे पुढे म्हणाले की, ५६ मुसलमान राष्ट्रांमध्ये ‘हलाल’ चिन्ह असलेली उत्पादने विकून त्यातून मिळणारा पैसा हा इस्लामिक आतंकवादाची ताकद वाढवण्यासाठी शस्त्रास्त्रे खरेदीसाठी वापरला जात आहे. अशा रितीने हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून सुमारे दोन ट्रिलियन डॉलर्स इतकी उलाढाल होत आहे. तोच पैसा इस्लामिक आतंकवादाची ताकद वाढवण्यासाठी वापरला जातो आणि त्यातलाच एक कसाब आमच्या माथ्यावर येतो आणि दोनशे अडीचशे माणसे मारतो !
‘हलाल’चे चिन्ह असलेल्या वस्तू सोडून द्या !पोंक्षे या वेळी म्हणाले ,‘‘सामान्य माणसांनी केवळ एवढेच केले पाहिजे की, कुठल्याही दुकानात गेल्यावर तेथील वस्तूवर ‘हलाल’चे चिन्ह असले की सरळ दुकानदाराकडे तक्रार करून ‘त्या वस्तूकडे दुर्लक्ष करा’, जपानी लोकांचे उदाहरण समोर ठेवा, ‘वस्तू सोडून द्या’, हळूहळू त्यांच्या या वस्तू सडतील आणि ‘हलाल’ची सक्ती बंद होईल !’’ |