फरिदाबाद (हरियाणा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण
फरिदाबाद (हरियाणा) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील शुभम् विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. शाळेचे संचालक श्री. ललित गुप्ता यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने घेतलेला उपक्रम अतिशय चांगला झाला’, असे सांगितले. या वेळी त्यांनी ‘पुढे विद्यार्थ्यांसाठी नैतिक मूल्यांवर आधारित मार्गदर्शन आयोजन करू’, असा मानस व्यक्त केला. या उपक्रमामध्ये विश्वविद्यालयाच्या सरोज गुप्ता यांनी सहभाग घेतला.