देहलीमध्ये मुसलमानांनी मारहाण केलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू
हिंदूंकडून आंदोलन
नवी देहली – देहलीच्या बलजीतनगर येथे २ दिवसांपूर्वी ३ मुसलमान तरुणांनी वादातून नीतेश, आलोक आणि माँटी या ३ हिंदु तरुणांवर केलेल्या आक्रमणात नीतेश आणि आलोक हे दोघेजण गंभीररित्या घायाळ झाले होते. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांतील नीतेश याचे १५ ऑटोबरला उपचार चालू असतांना निधन झाले. तो बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. नीतेश याच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर हिंदूंकडून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बजरंग दल कार्यकर्ता नितेश फ़ोर की जिहादियों ने पीट पीट कर मार डाला। घटना शादीपुर गाँव की। सुंदर नगरी का मामला अभी शांत भी नही हुआ था एक और हिंदू युवक की हत्या। @SureshChavhanke @KumaarSaagar pic.twitter.com/Kkfy8WgQzA
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) October 16, 2022
पोलिसांचा दावा आहे की, धार्मिक कारणामुळे नाही, तर दोन गटांतील वादांतून हे आक्रमण करण्यात आले होते. पहिले आक्रमण आलोक आणि नीतेश यांनीच केले होते. या दोघांवर पूर्वीही गुन्हे नोंद आहेत. उफीजा, अदनान आणि अब्बास अशी आरोपींची नावे असून ते सध्या पसार आहेत. यातील एक आरोपी बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कार्यकर्ता आहे.
संपादकीय भूमिका
|