६५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार !
सातारा, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – माण तालुक्यातील मार्डी येथील पवार वस्तीवर रहाणार्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवार वस्तीवर रहाणार्या आबा बाबा पवार यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. १० ऑक्टोबरच्या रात्री ११.३० वाजता पीडित वृद्ध महिला नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडली असतांना आबा पवार यांनी तोंड दाबून चाकूने वार करत वृद्ध महिलेवर बलात्कार केला. याविषयी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाछत्रपतींच्या महाराष्ट्रात युवती, तरुणी आणि वृद्ध महिलाही असुरक्षित असणे लज्जास्पद ! |