इंदापूर-बारामती रस्त्यावर ५५ लाख रुपयांचा गांजा शासनाधीन !
इंदापूर (जिल्हा पुणे) – इंदापूर-बारामती रस्त्यावर सोलापूरहून बारामतीकडे विक्रीसाठी नेत असलेला २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा ५४ लाख ५५ सहस्र रुपयांचा गांजा, तसेच ३ चारचाकी गाड्या असा एकूण ८० लाख ५५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला. यातील ५ आरोपींना अटक करण्यात आली, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली आहे.