दिवाळीनिमित्त अराजपत्रित शासकीय कर्मचार्यांना १२ सहस्र ५०० रुपये अग्रीम !
मुंबई – अराजपत्रित शासकीय कर्मचार्यांना उत्सव अग्रीम (आगाऊ रक्कम) म्हणून बिनव्याजी १२ सहस्र ५०० रुपये देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचार्यांप्रमाणेच गट ‘क’ आणि गट ‘ब’ या अराजपत्रित संवर्गातील कर्मचार्यांनाही उत्सव अग्रीम मिळणार आहे. ‘कर्मचार्यांनी ही उत्सव अग्रीम १० समान हप्त्यांत परतफेड करावी’, अशी अट घालण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष २०१८ मध्ये उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणार्या कर्मचार्यांची संख्या अनुमाने ५ लाख इतकी आहे.