वढू आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची स्वराज्य संघाची मागणी !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

पुणे – श्रीक्षेत्र वढू आणि तुळापूर या दोन्ही ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी स्वराज्य संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, जुन्नरचे माजी आमदार यांसह कीर्तनकार, अन् थेऊर ग्रामपंचायतचे सदस्य आदी उपस्थित होते. किल्ले शिवनेरी आणि पुरंदर गडाचे अनुक्रमे श्री शिवनेरी गड अन् श्री पुरंदर गड असे नामकरण करण्याची मागणी केली असता सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांचा वीणा, पगडी, चिपळ्या, उपरणे आणि हार घालून सत्कार करण्यात आला.