मुंबई येथे जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांना उलट्या झाल्याने त्यांचे वाटप थांबवले !

मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेविकांनी घरोघरी दिलेल्या जंतनाशक गोळ्या घेतल्याने लहान मुलांना उलट्या होत आहेत. या गोळ्या निकृष्ट दर्जाच्या किंवा जुन्या असल्याची भीती व्यक्त करत आरोग्यसेविकांनी गोळ्यांचे वाटप बंद केले आहे. वेष्टनातून या गोळ्या बाहेर काढताच लगेचच त्यांचा चुरा होतो. त्यामुळे या गोळ्यांच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने अधिवक्ता प्रकाश देवदास म्हणाले, ‘‘या प्रकारामुळे आरोग्यसेविका घाबरलेल्या आहेत. गोळ्यांचे वाटप बंद करण्याची सूचना आरोग्यसेविकांनी दिली आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास आरोग्यसेविकांना वस्त्यांमध्ये फिरणे कठीण होईल. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.’’ यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

संपादकीय भूमिका

  • जंतनाशक गोळ्यांच्या दर्जाची संबंधित आरोग्य अधिकार्‍यांनी पडताळणी केली नाही का ?
  • लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाईच करायला हवी !