कारंजा (लाड) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हलाल’ प्रमाणपत्राच्या विरोधात नायब तहसीलदारांना निवेदन !
कारंजा (लाड) (जिल्हा वाशिम ) – खासगी आस्थापनांना दिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती त्वरित रहित करावी, तसेच संबंधित संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून त्यांना मिळालेल्या निधीचा वापर आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ?, राष्ट्रीय सुरक्षेला यात काही धोका नाही ना ?, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कारंजा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार विलास जाधव यांना दिले. या वेळी धर्मजागरण मंच, हिंदु जनजागृती समिती यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.