‘आदिपुरुष’ चित्रपटाला विश्व हिंदु परिषदेला विरोध का करावा लागतो ? भाजप प्रशासन चित्रपटावर बंदी का घालत नाही ?
‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा विश्व हिंदु परिषदेनेही विरोध केला आहे. ‘हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चालू देणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. जानेवारी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संभल (उत्तरप्रदेश) येथील विहिंपचे विभाग प्रचारप्रमुख अजय शर्मा यांनी म्हटले की, चित्रपटांमध्ये हिंदूंच्या आदर्शांना चुकीच्या पद्धतीने दाखवणे ही धर्माची थट्टा आहे. सेन्सॉर बोर्ड दायित्वशून्यतेने काम करत आहे. बोर्ड त्याच्या कर्तव्यांचे पालन करत नाही. त्यामुळे सरकारने ते विसर्जित केले पाहिजे.’