‘अमूल’ दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ !
नवी देहली – ‘अमूल’ या आस्थापनाने त्याच्या दुधाच्या दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता अमूलचे दूध ६३ रुपये लिटर झाले आहे. साधारण ३ मासांपूर्वी म्हणजे १७ ऑगस्ट या दिवशी अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली होती. त्याही पूर्वी म्हणजे २८ फेब्रुवारी या दिवशीही प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
दिवाळीपूर्वी अमूलने ग्राहकांना झटका दिला आहे. अमूल डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. https://t.co/K4Tr7qfj0c
— Saamana (@SaamanaOnline) October 15, 2022