देहलीमधील मदरशाच्या मौलवीकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण
नवी देहली – देहलीतील मदिना मदरशाच्या मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) ११ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी करावल नगर येथील मदिना मशिदीतील मौलवी महंमद जावेद याला अटक केली.
A matter of sexual harassment to an 11-year-old boy from Gurugram was reported by the victim’s mother at Karawal Nagar PS. The victim studied in Madrasa. During investigation, the cleric Mohd Javed confessed his crime and revealed that he had sexually abused the boy: Delhi Police pic.twitter.com/D7apuligV4
— ANI (@ANI) October 14, 2022
देहलीतील शिव विहार परिसरातील करावल नगर येथील मदिना मशिदीच्या मदरशात हा विद्यार्थी गेली चार वर्षे शिकत होता. ११ ऑक्टोबर या दिवशी तो मदरशातून पळून घरी पोचला. त्याने मदरशाच्या मौलवी जावेदच्या कुकर्माची माहिती कुटुंबियांना दिली. यामुळे पीडित मुलाच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे त्वरित तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी मौलवीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३७७ कलमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकादेशभरातील अनेक मदरशांमध्ये अशा प्रकारचे अपप्रकार होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आता यावर आळा घालण्यासाठी आणि मुसलमान मुलांना मुख्य प्रवाहाचे शिक्षण देण्यासाठी मदरशांना ताळे ठोकण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ? |