सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावरील शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ प्राप्त !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सप्टेंबर २०२२ या मासात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित २ शोधनिबंध पुढील २ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर करण्यात आले.
वरील शोधनिबंधांचे सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य) असून त्यांनीच त्याचे ‘ऑनलाईन’ सादरीकरणही केले.
‘द नाईंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन आर्टस् अँड ह्युमॅनिटीज’ या परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधाला ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ८१ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९८ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. विश्वविद्यालयाला आतापर्यंत एकूण १२ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.