आतापर्यंत केवळ हिंदूंचेच खून व्हायचे, आता महंतांचेही व्हायला लागले आहेत, तर पुढे काय होईल, याची कल्पनाही करता येत नाही !
‘अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी महंत नरेंद्र गिरि यांचा शिष्य आनंद गिरि याला अटक करण्यात आली आहे, तर येथील लेटे हनुमानजी मंदिराचे पुजारी आद्याप्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. या दोघांची नावे महंतांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात होती.’