वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशात केलेल्या हिंदूंच्या अत्याचारांना ‘नरसंहार’ घोषित करा !
अमेरिकेच्या २ खासदारांचा संसदेत प्रस्ताव !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील रो खन्ना आणि सीव चाबोट या २ खासदारांनी संसदेत एक प्रस्ताव सादर केला आहे. यात वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचे बांगलादेश) हिंदू आणि बंगाली मुसलमान यांच्यावर केलेल्या अत्याचाराला ‘नरसंहार’ घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पाकिस्तानने बांगलादेशातील नागरिकांची क्षमा मागण्याचीही मागणी केली आहे. हे दोघेही खासदार भारतीय वंशाचे आहे.
The resolution called on the Pakistan government to apologise to the people of Bangladesh for its role in such a genocide.https://t.co/N6zw3mL9wo
— IndiaToday (@IndiaToday) October 15, 2022
खन्ना यांनी सांगितले की, वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशात जो नरसंहार झाला, त्यात लाखो लोक ठार झाले होते. यांतील ८० टक्के हिंदू होते.
संपादकीय भूमिकाभारतातील खासदार नाही, तर अमेरिकतील खासदार अशी मागणी करतात, हे भारताला लज्जास्पद ! भारताच्या संसदेत अशा प्रकारचा प्रस्ताव संमत करून बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठीही सरकारने कृतीशील व्हायला हवे ! |