छत्तीसगडमध्ये साधू-संतांना दिले जाणार ओळखपत्र !
रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील साधू-संतांसाठी आता ओळखपत्रे बनवण्यात येणार आहेत. याद्वारे साधूंचा वेश परिधान करून होणारी फसवणूक थांबवता येणार आहे. अखिल भारतीय संत समितीने या संदर्भात निर्णय घेतला आहे.
Bilaspur: छत्तीसगढ़ में साधु-संतों की पहचान के लिए बनेंगे ID कार्ड; संत समिति ने कहा-बाहरी लोग बदनाम कर रहे#Chhattisgarh #Saints #IDCardshttps://t.co/BhkrbY3Sa8
— Amar Ujala (@AmarUjalaNews) October 15, 2022
समितीचे प्रदेशाध्यक्ष महामंडलेश्वर लक्ष्मणदास यांनी म्हटले की, सनातन धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे. राज्याबाहेरून आलेले लोक सनातन धर्माला अपकीर्त करत आहेत. अशा प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.