अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्यांना एकूण ७५५ कोटी रुपयांचे साहाय्य !
मुंबई – राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी एकूण ७५५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ३ हेक्टरपर्यंतच्या हानीसाठी प्रत्येक हेक्टरी १३ ते ३६ सहस्र रुपये देण्यात येतील. निकषाच्या बाहेर असणार्या अन्य बाधित शेतकर्यांसाठी आणखी एकूण ७५५ कोटी ७० लाख रुपये साहाय्य देण्यात येणार आहे. जिरायत पिके, बागायती पिके आणि बहुवार्षिक पिके घेणार्या सर्वच शेतकर्यांना हे साहाय्य आतापर्यंत देणार्या येणार्या साहाय्याच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.