हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सर्वांनी सक्रीय योगदान द्यावे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
जालना येथे ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ निमित्त पत्रकार परिषद
जालना – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असणार्या हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सर्वांनी सक्रीय योगदान द्यावे’, असे आवाहन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
मधुबन हॉटेल, नवीन जालना येथे ही पत्रकार परिषद पार पडली. या वेळी समितीच्या जालना आणि संभाजीनगर जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे अन् धर्मप्रेमी श्री. दीपक म्हारोळकर उपस्थित होते.
हिंदू जनजागृती समितीच्या द्विदाशक पूर्ती अभियानानिमित्त जालना येथे पत्रकार परिषदेचे आयोजन.
धर्मांतरण,गोहत्या,लव्ह जिहाद,लँड जिहाद, हलाल जिहाद या समस्यांना रोखण्यासाठी हिंदूराष्ट्र का आवश्यक आहे ? तसेच
भारतभरातील @HinduJagrutiOrg च्या
हिंदूराष्ट्र संकल्प अभियान विषयी माहिती दिली. pic.twitter.com/hUlLo0Ly8U— Sunil Ghanwat (@SG_HJS) October 7, 2022
क्षणचित्रे
१. दैनिक ‘लोकप्रश्न’चे संपादक श्री. अभय यादव यांनी कु. प्रियांका लोणे यांचा सत्कार केला आणि त्यांनी कु. लोणे यांना वाकून नमस्कार केला. या वेळी कु. प्रियांका लोणे त्यांना म्हणाल्या, ‘‘मी आपल्यापेक्षा वयाने लहान आहे.’’ त्यावर श्री. अभय यादव म्हणाले, ‘‘स्त्री ही लहान किंवा मोठी असो, तिच्या सन्मानार्थ हा नमस्कार आहे.’’
२. या वेळी उपस्थित पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे श्री. सुनील घनवट, कु. प्रियांका लोणे आणि श्री. दीपक म्हारोळकर यांचा सत्कार केला.
३. सर्व पत्रकारांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या ग्रंथांची मागणी केली.
४. एका पत्रकाराने ‘आमचा परिवार आणि परिसरातील महिला यांच्यासाठी एक बैठक आयोजित करतो. त्यामध्ये तुम्ही त्यांचे प्रबोधन करा’, अशी मागणी कु. प्रियांका लोणे यांच्याकडे केली.